| पनवेल | वार्ताहर |
बेकायदा फुटपाथवर टेबल ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करून गॅस सिलिंडरच्या सहाय्याने शेगडी पेटवून अंडाभुर्जी विक्री करणार्याविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
शहरातील एसटी स्टँडसमोरील फुटपाथवर मधुकर जोशी या इसमाने टेबल ठेवून टेबलवर मानवी जीवितास धोकादायक ठरेल अशा रीतीने रहदारीस अडथळा निर्माण करून गॅस सिलिंडरच्या सहाय्याने शेगडी पेटवून अंडाभुर्जी विक्री करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क पोलीस निरीक्षक गणेश दळवी व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणावरून सिलिंडर, लोखंडी शेगडी व इतर ऐवज असा मिळून सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर, अशाचप्रकारे सुनीलकुमार भारती (45) याच्या वडापावच्या व्यवसायावर कारवाई करून त्याच्याकडून स्टीलची शेगडी, सिलिंडर व इतर ऐवज मिळून 800 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.