| पनवेल । वार्ताहर ।
रोडपाली परिसरात अवजड आणि घातक रसायनांचे टॅकर उभे केले जातात. रहिवाशांनी याबाबत वारंवार पोलीस विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र पोलिसांचे कारवाईत सातत्य नसल्याने हा प्रश्न सुटलेला नाही. पनवेल व उरण परिक्षेत्रासाठी नव्याने नियुक्त झालेल्या नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी मात्र रहिवाशांचा हा सामाजिक प्रश्नसोडविण्यासाठी पाऊल उचल्याचे चित्र आहे.
वसाहतीमध्ये बंदी असता नाही अवजड वाहने उभी केल्याने आता पर्यत आठ टँकरवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. रोडपाली परिसरात रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी करून चालक तेथेच त्यांचा संसार थाटतात. त्याच वाहनाशेजारी जेवण शिजवणे, आंघोळी करणे यामुळे या परिसरातील नागरिक त्रासले आहेत. सिडको मंडळाने या परिसरात अवजड वाहने येऊ नयेत यासाठी हाइट गेट उभारले. मात्र तेही अवजड वाहनांच्या ठोकरीने मोडून ठेवले. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी रहिवाशांच्या तक्रार अर्जांवर ही कारवाई करण्यास प्राधान्य दिल्याचे बोलले जात आहे.
उपायुक्तांच्या या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे झाकलेले रस्ते मोकळे होऊन रस्ते रुंद झाल्याचे दिसत आहे.पोलीस उपायुक्त डहाणे यांनी अवजड वाहनांनी लोकवस्तीमध्ये घुसखोरी केल्यास कारवाई करण्याचे आदेश दिल्याप्रमाणे पदपथावर रहदारीस अडचण करून घरगुती गॅस सिलेंडरच्या साह्याने व्यवसाय करणार्यांवर कारवाई करण्याचे फर्मान सोडले आहे. ज्वालाग्राही वस्तूमुळे इतरांच्या जिवाला धोका असल्याने पोलीस ही कारवाई करत आहेत.