| पनवेल | वार्ताहर |
खारघरमध्ये फूटपाथवरती उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपाऱ्या, नीराकेंद्र, दुकानाबाहेरील शेड, फुटपाथवरील अतिक्रमण तसेच खांदेश्वर रेल्वे स्टेशन बाहेरील अनधिकृत दुकाने, टपऱ्या अशा विविध ठिकाणी खारघर प्रभाग कार्यालय व कामोठे प्रभाग कार्यालयाच्यावतीने शुक्रवारी आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली.
खारघरमधील सेक्टर 8 ब, सेक्टर 5, सेक्टर 35 ई अशा विविध ठिकाणी फूटपाथवरती अनधिकृत टपाऱ्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच अनधिकृत नीराकेंद्र, दुकानाबाहेरील वाढवलेले शेड, हातगाड्याच्या संख्येमध्येही वाढ झाली होती. आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनूसार प्रभाग समिती अ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी अतिक्रमण विभागाच्यासाह्याने या संपूर्ण खारघरमध्ये तोडक कारवाई केली. तसेच टपऱ्यांमधील, दुकानांमधील सर्व साहित्य जप्त करण्यात आले.







