खासगी शाळांवर कारवाईचे आदेश

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व खासगी शाळांनी पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. परंतु, सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक खासगी शाळांमधील पालक-शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत सभासद आणि कार्यकारी समिति सदस्यांची यादी शिक्षण विभागाकडे सादर करणे बंधनकारक असताना, त्याची माहिती पनवेल शिक्षण विभाग, पंचायत समिति आणि जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे कायद्याची पायमल्ली आणि उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे सर्व खासगी शाळांनी पालक-शिक्षक संघाची स्थापना करावी आणि ज्या शाळा या संघाची स्थापन करणार नाहीत अशा शाळांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रहार संघटनेने केली होती. त्या निवेदनाची दखल घेत जिल्हा शिक्षणाधीकारी यांनी पनवेलच्या गट शिक्षणाधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिरीषकर यांनी दिली.

Exit mobile version