| पनवेल | प्रतिनिधी |
गोवंश जातीचे मांस मुंबई येथे विक्रीकरीता घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने यातील अटक दोन आरोपींना गोमांस असलेल्या झायलो कार क. एम.एच. 04 डी.वाय. 2421 सह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या घटनेबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
नमूद गुन्ह्याचे तपासात यातील अटक आरोपी यासीन मोईनुद्दीन शेख (37), पासु उस्मान कुरेशी (45), मोहंमद अली अकबर अली शाह (30) यांचेकडे केलेल्या तपासात सदर गोवंश जातीच्या 4 बैलांची कत्तल करून आणलेले मांस हे म्हाप्रळ,येथुन आरोपी गुलामगौस नसरूद्दीन मुकादम, (37) याच्याकडून आणले असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयाचा सखोल तपास केला असता टोळीप्रमुख अटक आरोपी यासीन मोईनुद्दीन शेख याने इतर साथीदारांसह एकत्रितरित्या व संघटीतपणे दहशत दाखवून हिंसेचा व इतर बेकायदेशीर कृत्यांचा वापर करून सदर बेकायदेशीर कृत्य सतत चालू ठेवलेबाबत त्यांचेवर इतर पोलीस ठाणे येथे देखील गुन्हे दाखल असल्याबाबत उघडकीस आले. नमूद गुन्ह्यातील अटक आरोपींनी हिंसाचाराचा वापर करून, धाकदपटशा करून व संघटीतपणे जबरदस्ती करून अवैध मार्गाने परिसरात दहशत माजवुन वर्चस्व निर्माण करण्याकरिता कृत्य केल्याचे दिसून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाउसाहेब ढोले हे करीत आहेत.







