| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
भारतीय खाद्य निगम(एफ.सी.आय.) मंडल कार्यालय, पनवेल यांच्यावतीने अंतर-मंडलीय क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मंडल कार्यालय मनमाड संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर मंडल कार्यालय पनवेल संघाने उपविजेतेपद मिळवले. स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी मंडल प्रबंधक, पनवेल राजेश ईश्वरदास उंदीरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी आंचलिक कार्यालय, मुंबई येथील कार्यकारी निदेशक (पश्चिम)अश्विनी कुमार गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन आर.एस.पी.सी. महाराष्ट्र यांच्या माध्यमातून करण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाव्यवस्थापक (महाराष्ट्र) हरनारायण सिंह तसेच उपमहाव्यवस्थापक (महाराष्ट्र) गौतम कुमार आणि उपमहाव्यवस्थापक (लेखा) राजेश वर्मा यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेमुळे विविध मंडळांतील खेळाडूंमध्ये क्रीडास्पर्धेची भावना आणि संघभावना अधिक दृढ झाली असून, अशा उपक्रमांमुळे कर्मचारीवर्गामध्ये उत्साह व एकात्मता वाढीस लागते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.







