| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलिसांनी पिके मुन नाईट बार अँड रेस्टॉरंटवर छापा टाकत महिला वेटर, कॅशियर, मॅनेजर आणि तीन पुरुष वेटर अशा 14 जणांविरोधात 23 जून रोजी गुन्हा दाखल केला.
22 जून रोजी रात्री अकराच्या सुमारास पिके मुन नाईट बार अँड रेस्टॉरंट, पळस्पे गाव येथे सात महिला ठेवणे बंधनकारक असताना सातपेक्षा जास्त महिला दिसून आल्या आणि या महिलांनी नियमांचे उल्लंघन केले. या महिलांनी मद्यपान गृह, उपाहारगृह येथे नृत्य करण्यास मनाई असतानाही तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांशी अंगाशी लगट केले, तसेच अंग विक्षिप्त, अश्लील कृत्य करून नृत्य करताना दिसून आल्या. तसेच बारमधील मॅनेजर अजय अयोध्या पास्वान आणि पिंटूकुमार यादव, संजय साकेत, प्रकाश त्रिपाठी, अरविंद यादव यांच्यासह बारमधील नऊ महिला वेटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.







