‘लसवंत व्हा नाहीतर कठोर कारवाई करणार’

तहसीलदार समीर घारे यांचा इशारा
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
देशात आणि राज्यात आजूनही कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला नाही.कोरोनाला कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी 100 टक्के लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत सर्वांनी लसवंत व्हा नाहीतर स्थानिक पातळीवर कारवाईला सामोरे जा असा सुचक इशारा दिला आहे.
म्हसळा तालुका तहसीलदार समीर घारे यांनी त्यांच्या कार्यालयात तालुक्यातील धान्य दुकानदार, रास्त भाव धान्य व केरोसीन विक्रेते, हॉटेल संघटना, टपरी धारक, फेरीवाले, आटो रिक्षा, मिनोडोअर संघटना, गॅस विक्रेते, शिवभोजन केंद्र आणि विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्थांची सभा घेऊन येत्या 10 दिवसांत नागरिकांना लसवंत व्हावे अन्यथा महसुल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाचे मदतीने वेगवेगळ्या प्रकारच्या शासन कारवाईना सामोरे जावे लागेल असा सुचक इशारा देण्यात आला आहे. या सभेला निवासी नायब तहसिलदार के.टी. भिंगारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड, पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदू सावंत, रिक्षा युनियन अध्यक्ष रियाज घराडे, मेडिकल असोसिएशनचे मोहीत मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version