राणे यांच्या सत्कारावेळी कार्यकर्ते भिडले

| चिपळूण । वार्ताहर ।
मराठा समाजातर्फे येथील आथिती हॉटेलसमोर महामार्गालगत नारायण राणे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण मध्ये मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना तलवार भेट दिली. याचवेळी शिवसैनिक चाल करत घटनास्थळी आले. यावेळी भाजप कार्यकर्ते त्यांना भिडले.सेना कार्यकर्त्यांनी राणे विरोधात घोषणा दिल्या. याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखले. दरम्यान, चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे शिवसैनिक आक्रमक झाल्याचेही दिसून आले. येथे नारायण राणे यांचे पोस्टर फाडण्यात आले तर किरकोळ दगडफेकही झाली. येथे आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले.

Exit mobile version