सुधागडात भाजपला धक्का; कळंब धनगरवाडीतील कार्यकर्ते शेकापमध्ये

शेकाप नेते सुरेश खैरे यांनी केले स्वागत
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन सुधागड तालुक्यातील कळंब धनगरवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कार्यक्रम मंगळवारी पार पडला. सर्व प्रवेशकर्त्यांचे शेकाप नेते तथा जि.प. सदस्य सुरेश खैरे यांनी स्वागत केले.

माजी आ. धैर्यशील पाटील व शेकाप नेते सुरेश खैरे यांच्या नेतृत्व व प्रभावी कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून तसेच विकासकामांवर आकर्षित होऊन शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवाहात सामील झाल्याचे प्रवेशकर्त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अनंता ढेबे, धोंडू ढेबे, धाऊ ढेबे, राजेश ढेबे, भगवान ढेबे, चंद्रकांत ढेबे, लक्ष्मण ढेबे, किरण खरात, दीपक खरात, महेश खरात, बापू बावदाने, सुनील बावदाने, भगवान बावदाने, राजेश बावदाने, महादेव बावदाने, दशरथ बावदाने, नरेश आखाडे, तुकाराम आखाडे, रामा आखाडे, प्रकाश झोरे, तुकाराम राया आखाडे, बबन झोरे, वसंत झोरे, गौरु बेलोसे, उमा बडतोड आदींचा समावेश आहे.

यावेळी शेकाप नेते सुरेश खैरे, पांडुरंग आखाडे, विलास मानकर, विठ्ठल सिंदकर, सरपंच संजय हुले, गुलाब हिरवे, अ‍ॅड. प्रवीण कुंभार, संतोष चव्हाण, राजेश तळेकर, राकेश मानकर, नामदेव बडतोड, अमोल मानकर, रमेश हिरवे, सुभाष बडतोड, हरेश वारे, मूलचंद बडतोड, वसंत बडतोड, निखिल मानकर, दीपक मानकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version