। अलिबाग । प्रतिनिधी ।
शिंदे गटातील कारभाराला कंटाळून ताराबंदर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शेकापचे वामन चुनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रविवारी (दि.10) अभय पंढर, राहूल पंढर, मंदार साक्षीकर, साहिल नागोजी, निखील कोटकर, रोशन पंढर, सौरभ नागोजी, सुजय गोगर, पंकज भोईनकर आदी शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. नवनिर्वाचित सर्व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ व शेकापचे लाल मफलर देऊन स्वागत करण्यात आले. शिंदे गटातील तरुण युवकांनी शेकापमध्ये प्रवेश केल्याने ऐन निवडणुकीत शिंदे गटातील आमदारांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी मुरूडमधील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय गिदी, सदानंद पाटील, भारती बंदरी, शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.