। अलिबाग । प्रतिनिधी ।
मतदार याद्यांच्या घोळा विरोधात शेकापसह महाविकास आघाडी – मनसेच्यावतीने मुंबईमध्ये आज ( दि. 1) विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्या मोर्चासाठी रायगड जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते शनिवारी सकाळी अलिबागचा अनेक भागातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांचा एक वेगळा उत्साह दिसून आला.





