सावर्डे विद्यालयात हर घर तिरंगा अंतर्गत उपक्रम

। चिपळूण । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वतंत्र संग्रामातील क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी राबविलेल्या स्त्युत उपक्रमात सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

माझा तिरंगा माझा अभिमान, मी तिरंगा बोलतोय व भारताचे स्वतंत्रता सेनानी या विषयावर आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेला प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक गटात आयुष पवार,युवराज रसाळ यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. तर अमोघ साठे व अमेय नांदिवडेकर यांनी विभागून तृतीय क्रमांक मिळवला.समीक्षा बागवे व स्फूर्ती जाधव यांनी परीक्षण केले.माध्यमिक गटात समिक्षा सातभाई व आर्या नांदिवडेकर यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. तर स्नेहा चव्हाण व आदिती राडे या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. दिशा विचारे व अनुजा बागवे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

Exit mobile version