। पुणे । प्रतिनिधी ।
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (वय 77) यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 5 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या खालावली आहे.
गेल्या 15 दिवसांपासून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती आता चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती समोर आलेली नाही.