। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा, चौल व थेरोंडा विभागाच्या शिवसेना उध्द्वव ठाकरे युवा सेना अधिकार्यांच्या नेमणुका नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये युवासेना चौल विभाग चिटणीसपदी केदार मळेकर, युवासेना उपविभाग अधिकारीपदी प्रणव कुर्वे, युवासेना थेरोंडा शाखा अधिकारीपदी जगदीश राघोजी, युवासेना चौल शाखा अधिकारीपदी अजिक्य मिसाळ, तसेच युवासेना उपविभाग अधिकारीपदी सुरज म्हात्रे यांच्या नियुक्ता जाहीर करण्यात आल्या.
यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक हर्षल घरत, व युवासेना अलिबाग उपतालुका अधिकारी तेजस शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचीत युवासेना पदाधिकारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.