कर्जतबद्दल अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली….सोशल मिडियावरील पोस्ट चर्चेत

तसा माझा त्याचा माझ्याशी काहीच संबंध नव्हता. त्याचे वडिल आमच्याकडे पुर्वी पंप ऑपरेटर म्हणुन काम करायचे. आम्ही सगळे लहान होतो. तो तेव्हा त्याच्या वडिलांबरोबर आमच्याकडे यायचा. आमच्यात खेळायचा. आजीकडे एक-दोनदा जेवलाही होता आमच्याबरोबर. आम्ही मोठे झालो. कामंधंदे सुरु झाले. तोही कामे करत होता, मिळतील ती. कधी हॅाटेलमध्ये शेफ, कधी कंत्राटी कामगार, प्लंबर, तर कधी गाण्याचे कार्यक्रम करायचा. मी कर्जतला आले की मला न चुकता ज्युई कशी आहेस? हे विचारायचा. आमच्या शेजारच्या वाड्यात राहायचा. त्यामुळे तशी नेहामीच भेट व्हायची.

काल अचानक त्याच्या जाण्याची बातमी आली आणि मनात खुप चलबिचल झाली. काय झालं असेल त्याला? अचानक असं कसं? खोटी तर नाही ना बातमी? परवाच तर भेटला होता….
आज कारण कळलं. ताप आला म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्याला. सलाईन लावलं. त्याच्या तोंडातुन फेस आला. तब्येत खालावली म्हणुन पनवेलला नेलं. तिथल्या डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नक्की काय झालं असेल? काहीच कळत नाही पण मनात बर्‍याच वर्षांपासुन कर्जतच्या या गोष्टी बद्दल असलेली चीड ऊफाळुन आली.
सगळ्यांचंच नशिब बलवत्तर नसतं. काही वर्षांपुर्वी माझ्या वडिलांना घरात लग्न असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना पनवेलला न्यावं लागलं. तिथेही उपचार झाले नाही म्हणुन मग नेरुळला त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मुद्दा असा की एवढ्या वर्षात कर्जतमध्ये एक चांगलं हॅास्पिटल असु नये? प्रत्येक वेळी काही तातडीचे उपचार करण्याची वेळ आली की माणसांना लोधिवली किंवा पनवेलला न्यायचं? का? माणसाचं आयुष्य इतकं सहजतेने का घेतलं जातय ईथे?

बरं, हॅास्पिटल म्हंटलं कि किमान 24 तास विजेची गरज.. तर त्या बद्दल तर न बोललेलच बरं. मी कर्जतकर आहे आणि म्हणुन मला माझ्या गावात या किमान गरजा पुर्ण झालेल्या हव्यात. एक तास असा जात नाही इथे जेव्हा लाईट जात नाही. एरव्ही लोडशेडींग तर हक्काने असतच. मग काय तर पावसाळा. मग काय तर आज झाडं कापायची होती. या बाबी मान्यच आहेत. पण या लाईटच्या सततच्या जाण्याने आपण किती वर्ष मागे चाललोय हे का कळत नाहिये कोणालाच? कधीही लाईट गेले आणि एमएसइबीला कॅाल केला कि उत्तर मिळतं खोपोलीवरुन गेली आहे. गेली 34 वर्ष मी आणि किमान 50-60 वर्ष घरातले इतर हिच उत्तरं ऐकताहेत. पण यावर अजुनही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सगळ्यांकडे इन्व्हर्टर आहेत. अन्नं वस्त्र निवारा आणि इन्व्हर्टर या करजतकरांच्या किमान गरजा आहेत. पण इन्व्हर्टर चार्ज होण्यापुरतं तरी लाईट असायला हवेत ना!

मुंबईपासुन अवघ्या 2 तासावर अशी जाहिरात करणारे पण या बाबतीत विचार करतच नाही की, मुंबईपासुन एवढ्या जवळ असुन ही आमच्याकडे या किमान गरजा 2022 मध्ये पण पुर्ण झालेल्या नाहियेत.. या बाबतीत सगळेच शांत, कितीही जीव का जाईनात आम्हाला सिंव्हगड बाय डेक्कन एवढंच लाईफ आहे.
वाईट वाटतंय. आज मी माझ्या अत्यंत लाडक्या कर्जतबद्दल अशा प्रकारे लिहीतेय पण एक चांगलं हॅास्पिटल आणि 24तास लाईट हे माझं स्वप्नं कधी पुर्ण होईल माहित नाही. पण आमच्या कर्जतला एकदातरी याच खुप सुंदर आहे ते.

Exit mobile version