आदर्श आगरी वधू-वर मेळाव्याचे आयोजन

| अलिबाग | प्रतिनिधी |

आदर्श आगरी युवक मंडळ, शाखा अलिबाग तर्फे 98 व्या आगरी वधू-वर मेळाव्याचे रविवार दि.21 रोजी आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा कर्णिक हॉल, पंतनगर, चेंढरे-अलिबाग येथे सकाळी 9 ते दुपारी 12:30 च्या दरम्यान संपन्न होणार आहे.

आदर्श अग्रसेन वधू-वर परिचय केंद्राच्या आतापर्यंत अलिबाग, उरण, कोपरखैरणे, ठाणे, डोंबिवली, वडाळा, पुणे, विरार, कमोठे, पालघर अशा 10 शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांमध्ये उत्तम प्रकारे वधू-वर नोंदणी होत आहे. रविवार दि. 21 रोजी होणारा 98 वा वधूवर मेळावा हा नियोजनबद्ध करण्याचा आयोजकांचा मानस आहे. आतापर्यंत होत असलेली नोंदणी पाहता कार्यक्रमस्थळी गैरसोय होऊ नये म्हणून आधीच नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

एका वर्षासाठी नोंदणी फी रु 1000 मात्र राहील. मेळाव्याच्या दिवशी हॉलच्या ठिकाणीही नवीन वधुवर नोंदणी करण्यात येईल. नोंदणीकृत उमेदवारास वर्षभरात कोणत्याही शाखेतर्फे जेवढे वधूवर मेळावे होतील तेथे मोफत प्रवेश तसेच अग्रसेन मासिक दिवाळी अंकासहीत मिळेल. कार्यक्रमस्थळी वधू-वरांसोबत आई व वडील अशा फक्त 3 जणांनाच मेळाव्यात प्रवेश मिळेल. नवीन नोंदणी करण्यासाठी अलिबाग शाखा, सौ. दिपश्री पाटील (9822491118), सई कलेक्शन, जुन्या नगरपालिकेजवळ, अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version