डि.बी.म्हात्रे यांना आदर्श वस्ताद पुरस्कार

| पनवेल । वार्ताहर ।

वावंजे ग्रामपंचायत सरपंच आणि कुस्ती या खेळासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डि.बी.म्हात्रे यांना महाराष्ट्र भूषण गौरव आदर्श वस्ताद पुरस्कार-2023 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा 15 मार्च रोजी आयोजित केला गेला होता. महाराष्ट्र भूषण गौरव आदर्श वस्ताद पुरस्कार-2023 मिळाल्याबद्दल डि.बी.म्हात्रे यांचे अभिनंदन केले जात आहे.

जय मल्हार फाऊंडेशन आणि जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल या कुस्ती संकुलाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने कला, क्रीडा आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जय मल्हार फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले होते. या पुरस्कारासाठी छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय कुस्ती संकुल तालमीचे मार्गदर्शक वस्ताद डि.बी.म्हात्रे यांनी कुस्ती या खेळासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र भूषण गौरव आदर्श वस्ताद पुरस्कार प्रदान करण्यात आला. हनुमान आखाड्याचे वस्ताद गणेश दागंट यांच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन जय मल्हार फाउंडेशन व जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब धावडे (आदर्श वस्ताद) यांनी केले होते.

Exit mobile version