मे 2022 रोजी बांधण आंबेपुर येथे होणार पुरस्कार प्रदान
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील संपर्क बालग्राम बांधण येथे रविवार दि 8 मे 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता सामाजिक, सांस्कृतिक, कला, पर्यावरण, संघटन, पत्रकारिता, आदी क्षेत्रातील मान्यवरांना ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य काळभोर पुणे यांच्या वतीने राज्यस्तरिय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत या पुरस्काराचे स्वरूप मायेची शाल श्रीफळ, सन्मान चिन्न, आणि प्रशस्तीपत्र असे असणार आहे
यामध्ये अलिबाग व पेण तालुक्यातील मान्यवरांचा समावेश आहे त्यामध्ये भाकरवड गावचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार श्री जीवन पाटील यांना ग्रीन वल्ड, श्री दीपक पाटील पत्रकार वाघरन यांना आदर्श पत्रकार भूषण, श्री किशोर पाटील यांना आदर्श शिक्षक जीवनगौरव पुरस्कार, रसिक म्हात्रे यांना कलारत्न महाराष्ट्र भूषण, अनिल म्हात्रे यांना कलारत्न महाराष्ट्र भूषण जिविता पाटील यांना रणरागिणी महाराष्ट्र भूषण, स्वप्नाली माळी उंबर्डे पेण रणरागिणी महाराष्ट्र भूषण, अँड गीता म्हात्रे ताडवागले, जीवन दिगंबर पाटील कातळपाडा आदर्श समाज भूषण, धनलक्ष्मी स्वयंमसायता महिला बचत गट भाकरवड राजमाता जिजाऊ महाराष्ट्र भूषण, भाग्यश्री माळी सारसोले पनवेल रणरागिणी महाराष्ट्र भूषण, देवेंद्र केळुस्कर पोयनाड कलारत्न, आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे ग्रीन फाउंडेशन चे सवस्थापक अध्यक्ष श्री अमित जगताप यांनी सांगितले आहे
या पुरस्काराचे वितरन पुणे काळभोर येथे होणार होते मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दोन वर्षे हा सन्मान सोहळा संपन्न झाला नाही आता नियम शिखिल झाल्या मुले ग्रीन फाउंडेशन च्या माध्यमातून हा पुरस्कार रविवार दि 8 मे 2022 रोजी सन्मानीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे