| अलिबाग । वार्ताहर ।
शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था मुंबईतर्फे दिला जाणारा अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार स्मिता गणेश पाटील यांना जाहीर झाला आहे. त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून त्या उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तसेच साहित्यिक कार्यासोबत त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्यही उल्लेखनीय आहे. म्हणून साहित्यकलेच्या सन्मानार्थ त्यांना अष्टपैलू काव्यभूषण हा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.