| रायगड | प्रतिनिधी |
जेएसएम महाविद्यालयात एनएसएस प्रसिद्धी साप्ताहानिमित्त अलिबागचे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांचे व्यसनमुक्ती या विषयावर व्याख्यान शनिवारी आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्रा. शाम जोगळेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत प्रा. विनायक साळुंखे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले कि, आज समाजात युवकवर्ग हा व्यसणाच्या विळख्यात अडकत आहे. विदयार्थ्यांचे व्यसनाबाबत प्रबोधन व्हावे या हेतूने या व्याख्यानाचे आयोजन केले. डॉ. अनिल डोंगरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले व्यसनाधिनता ही एक मानसिक विकृती आहे. व्यसन हे एक आकर्षण आहे मग ते दारूचे, तंबाखूचे किंवा चरस गांजाचे असो. त्यानंतर डॉ. डोंगरे यांनी व्यसनाची कारणे त्याचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम काय आहेत. त्यावरील उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. आपल्या मनोगताच्या शेवटी डॉ. अनिल डोंगरे यांनी सांगितले कि, व्यसनमुक्तीसाठी सकारात्मक मानसिकता व विचार आवश्यक आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.