| चिपळूण । वार्ताहर ।
रोटरॅक्ट क्बलने गांधारेश्वर येथे सेल्फी पॉइंटचे उद्घाटन आ. शेखर निकम याच्या हास्ते झाले. शहरात सार्वजनिक ठिकाणी सुशोभीकरण तसेच सामाजिक उपक्रम राबवावेत, त्याला आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही आ. निकम यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.
रोटरॅक्ट क्लब, चिपळूण हा रोटरी परिवारातील युवक-युवतींचा इंटरनॅशनल क्लब असून गेली 26 वर्षे चिपळूणमध्ये कार्यरत आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक उपक्रम या क्लबमार्फत सातत्याने राबवले जातात. फन एन फेअरसारखा प्रोजेक्ट सातत्याने हा क्लब घेत आहे. चिपळूणच्या सौंदर्यात भर टाकावी या हेतूने 2021-22 चे अध्यक्ष सिद्धेश जाधव आणि सचिव आकाश रेडीज यांनी हा सेल्फी पॉइंट उभारण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रोजेक्ट गतवर्षात होऊ शकला नव्हता. यावर्षी ते पूर्णत्वास गेले. या वेळी आकाश रेडीज, सिद्धेश जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. काळभैरव देवस्थानने सेल्फी पॉइंटसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानले.
चिपळूण शहराच्या सौंदर्यात भर
