| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची गोल्फपटू अदती अशोक हिचे कास्यपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. तिसर्या राऊंडपर्यंत आदिती तमान भारतीयांच्या अपेक्षेला अगदी तंतोतंत उतरली. मात्र, मध्येच खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि आदिती तिसर्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली. त्यामुळे 72 होल्सच्या खेळानंतर आदितीला अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मात्र, अस जरी असलं, तरी पहिल्या तीन राऊंड्समध्ये आदिती दुसर्या स्थानावर कायम होती. आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोल्फपटूला ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही. आदितीच्या या कामगिरीवर यामध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणार्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरलं, तर न्यूझीलंडच्या लिडिओ कोनं ब्राँझ मेडल जिंकलं.
अदिती अशोकचं पदक हुकलं
