जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध पालकमंत्री आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणार्‍या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी येथे केले.
अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द. मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, डॉ. ज्ञानदा फणसे, मुख्य वित्त लेखा अधिकारी श्री. घाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, व्यवस्थापक श्यामकांत चकोर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसीलदार विशाल दौंडकर, मीनल दळवी, सतीश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, प्रवीण बोणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version