इस्रोने रचला नवा इतिहास
| मुंबई | वृत्तसंस्था |
भारताची पहिलीच सौरमोहीम आदित्य एल-1 ही यशस्वीपणे पार पाडून इस्रोने नवा इतिहास रचला आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात आला आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह याठिकाणी पोहोचला. आता इथूनच पुढील पाच वर्षेे तो सूर्याचे निरीक्षण करणार आहे आणि मिळालेली माहिती इस्रोला पाठवणार आहे.
आदित्य यानाने देखील इस्रोला एक संदेश देत आपण सुरक्षितपणे एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचल्याचे सांगितले. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. एवढ्या दूर असूनही मी तुमच्या अगदी जवळ आहे. आपण सूर्याची गुपिते आता उघड करणार आहोत, असेही संदेशात नमुद केले आहे.






