आदित्य ठाकरेंचा महायुतीला टोला

। मुंबई । प्रतिनिधी ।

मंत्रिमंडळ विस्तार होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप सरकारचे खातेवाटप झालेले नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आ. आदित्य ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी एक सामाजिक मध्यमावर पोस्ट करत महायुतीवर टीका केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन चार दिवस झाले. हिवाळी अधिवेशन सुरू होऊन चार दिवस झाले. तरिही अद्याप मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही. लोकांचे प्रश्‍न कुणासमोर मांडाचे हे आमदारांना समजत नाही. महायुतीतील तीन पक्षांत खूप गोंधळ सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी शपथ घेतल्या आहेत त्यांच्यात किती स्वार्थ आहे. आनंदाने लोकांची सेवा करण्याऐवजी ते खातेवाटपावरून भांडण्यात व्यस्त आहेत. हा निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा अपमान आहे. जर सुरुवात अशी असेल तर पुढे हे कसे होणार? असे आदित्य ठाकरे यांनी लिहीले आहे.

Exit mobile version