| पेण | प्रतिनिधी |
दैनिक कृषीवलमध्ये वारंवार पेण शहराची फणसडोंगरी, पिरडोंगरी, बोरगाव या भागांमध्ये गांजासह अमली पदार्थ विकत असल्याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले. 21 जुलै रोजीदेखील याठिकाणी गांजा विक्री होत असल्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पेण पोलीस प्रशासनास जाग आली असून, पिरडोंगरी नवीन वसाहत येथील रहिवासी मुकेश अनंत पाटीलला अटक करुन त्याच्याकडून 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
पेण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद केला असून, आरोपी मुकेशला पहाटे 3 वाजून 9 मिनिटांनी अटक केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षण देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई प्रतीक पोकळे अधिक तपास करत आहेत. पोलीस यंत्रणा आपल्या सवडीनुसार कारवाई करीत असल्यानेच अवैधरित्या अमली पदार्थ व गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले आहेत.