अलिबाग तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीवर प्रशासक

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यात सरपंच पदाचा पाच वर्षाचा कार्यकाल संपून मुदत संपल्याने एकूण तेरा ग्रामपंचायतीच्या कारभार शासकीय प्रशासकाचे हाती जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांचे आदेशाने सोपविण्यात आला आहे. खंडाळे ग्रामपंचायतीत प्रशासक मंगेश रामचंद्र पाटील- आरोग्य विस्तार अधिकारी, वाडगाव ग्रामपंचायतीत प्रशासक दयाळु भिका राठोड-विस्तार अधिकारी पंचायत, किहिम ग्रामपंचायत प्रशासक मंगेश रामचंद्र पाटील-आरोग्य विस्तार अधिकारी, आवास ग्रामपंचायत प्रशासक ज्ञानेश्वर लक्ष्मण साळावकर-पंचायत विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत मिळकतखार प्रशासक विजय मारूती साबळे-कृषी विस्तार अधिकारी, माणकुळे ग्रामपंचायत प्रशासक विजय मारूती साबळे-कृषी विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत चिचंवली प्रशासक हेमलता वाडेकर-आरोग्य विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत पेढांब प्रशासक-हेमलता वाडेकर-आरोग्य विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कामार्ले प्रशासक प्रार्थना भोईर- कृषी विस्तार अधिकारी, शहाबाज ग्रामपंचायत प्रशासक शर्मिला भास्कर पाटील-पंचायत विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत रेवदंडा प्रशासक – दयाळू भिका राठोड पंचायत विस्तार अधिकारी, नागाव ग्रामपंचायत प्रशासक -ज्ञानेश्वर लक्ष्मण साळावकर पंचायत विस्तार अधिकारी यांची नियुक्ती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाने दि. 10,16,22,25,26,जुलै 2023 रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून करण्यात आली आहे.

Exit mobile version