शासकीय मूकबधिर विद्यालयात प्रवेश मोफत

| रायगड | वार्ताहर |

शासकीय मुकबधिर विद्यालय, विद्यानगर, अलिबाग येथे मोफत प्रवेश देणे सुरु करण्यात आले असून, 06 ते 16 वयोगटातील मुला-मुलींच्या इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अधीक्षक, शासकीय मुकबधिर विद्यालय, विद्यानगर-अलिबाग, जि. रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी केले आहे.

रायगड जिल्हा व कोकण विभागातील कर्णबधिर मुला-मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी शासनाने विद्यानगर-अलिबाग येथे शासकीय मुकबधिर विद्यालय सुरू केले आहे. या संस्थेत 06 ते 16 वयोगटातील मुकबधिर मुला-मुलींसाठी इयत्ता 1 ली ते 4 थीपर्यंतचे मोफत शिक्षण देण्यात येते. प्रवेशित मुला-मुलीसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था आहे. भोजन, वह्या, पुस्तके व शैक्षणिक साधने आदी सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी श्री. शिंदे (प्र.अधीक्षक) 9594313179, श्री. वेखंडे 7030390020, श्री. बोरकर 9970525345 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version