अ‍ॅड. गौतम पाटील यांना “भारत शिक्षण रत्न” पुरस्कार जाहीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
दिल्ली येथील “ग्लोबल सोसायटी फॉर हेल्थ अँड एज्युकेशनल ग्रोथ” या संस्थेमार्फत अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, अ‍ॅड. गौतम पाटील यांना “भारत शिक्षण रत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या आतापर्यंतचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर महाविद्यालयात केलेले सकारात्मक भरीव कार्य, नगरसेवक म्हणून केलेले सामाजिक कार्य, वकीली व्यवसाय, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून केलेले कार्य, खेळासाठी दिलेले प्रोत्साहन या सर्वांचा विचार करून अ‍ॅड. गौतम पाटील यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी दिल्लीच्या “कॉन्स्टिट्यूशन क्लब” येथे होणाऱ्या एक समारंभात हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते अ‍ॅड. गौतम पाटील यांना प्रदान केला जाणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अ‍ॅड.गौतम पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version