अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉचे दोन नवीन अभ्यासक्रम सुरु

डिप्लोमा इन लेबर लॉ रोजगार संधीचे नवे दालन उघडणार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी सोमवारी (दि.20) दोन नवीन अभ्यासक्रमाची घोषणा केली. कायद्यातील दस्तऐवज व मसुदे अभ्यासक्रमामुळे वैविध्यपूर्ण शिक्षणाची उभारणी केली जात आहे. दस्तऐवजाच्या अभ्यासक्रमामुळे वकिली व्यवसायात कौशल्य प्राप्त होऊ शकेल व लेबर लॉच्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराची नवीन संधी उपलब्ध होऊ शकेल, असा विश्‍वास अ‍ॅड. गौतम पाटील यांनी व्यक्त केला.

या कोर्सचे उद्घाटन अलिबाग बार कौन्सिलचे अध्यक्ष व अलिबागेतील ज्येष्ठ विधितज्ञ अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. दि. 4 जुलै 2022 पासून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन कॉलेजच्यावतीने करण्यात आले आहे. डिप्लोमा इन लेबर लॉफ हा अभ्यासक्रम संपूर्ण इंग्रजी माध्यमातून व कायद्यातील दस्तऐवज व मसुदे हा अभ्यासक्रम संपूर्ण मराठी माध्यमातून असणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व डिप्लोमा इन लेबर लॉ या अभ्यासक्रमाची माहिती अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्या डॉ. रेश्मा पाटील यांनी दिली. तसेच कायद्यातील दस्तऐवज व मसुदे या अभ्यासक्रमाची माहिती अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या उप प्राचार्या अ‍ॅड. निलम हजारे यांनी दिली.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक अ‍ॅड. दिपक नागे, अ‍ॅड. मेघा, अ‍ॅड. समिक्षा, जनता शिक्षण मंडळाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, मा. अ‍ॅड. प्रशांत पाटील तसेच महाविद्यालयीन विकास समितीच्या सदस्य अ‍ॅड. मानसी म्हात्रे, व जनता शिक्षण मंडळाचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. सचिन जोशी उपस्थित होते

Exit mobile version