अॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ अलिबाग येथे मूट मेथलॉजी म्हणजेच अभिरूप न्यायालयाचे शास्त्रीय विषयावर दि. 17 ते 19 एप्रिल दरम्यान ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले. विधी अभ्यासक्रमाच्या पाच वर्ष आणि तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला. या वेबीनारमध्ये विद्यार्थ्यांना दिव्यश्री दाचा यांनी अभिरूप न्यायालय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यानी कशा प्रकारे तयारी करावी याबाबत मार्गदर्शक केले. या वेबिनारचे आयोजन तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी केले होते.
प्रास्ताविक जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी केले. वेबीनारचा हेतू स्पष्ट करून व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध विषयांचा वेबीनारचे आश्वासन महाविद्यालयाच्या प्राचार्या निलम हजारे यांनी दिले. वेबीनार मधील मुटकोर्टच्या विषयाचे सविस्तर मार्गदर्शन मनोज धुमाळ ह्यांनी विद्यार्थ्यांना दिले. तर प्रा. संदीप घाडगे यांनी आभार मानले.