अ‍ॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालयाचा एल्. एल्.बी चा निकाल १०० टक्के

तर प्रियल मोरे महाविद्यालयात प्रथम
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तीन वर्ष विधी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाचा निकाल मुबंई विदयापीठाने जाहिर केला. यामध्ये जे. एस्. एम् चे अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉ या महाविदयालयाच्या तीन वर्ष एल्. एल्.बी परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये प्रियल मोरे ही 70.10 टक्क्यांनी महाविद्यालयात प्रथम आली. सर्व गुणवत्ताधारक उत्तीर्ण विदयार्थ्यांचा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अ‍ॅड. गौतम पाटील यांनी अभिनंदन केले तसेच इतक्या वर्षांमध्ये प्रथमच 100टक्के निकाल महाविद्यालयाचा लागल्यामुळे आनंदामध्ये अधिक वाढ झाली आहे. आता पुढे देखील असाच निकाल लागेल यासाठी अधिक मेहनत घेतली जाईल असे मत त्यांनी यावेळी वेक्त केल. याशिवाय सर्व विदयार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी तसेच पुढील कार्यक्षेत्रासाठी शुभेच्छा दिल्या. या परिक्षेत एकूण 56 विदयार्थ्यां पैकी 25 विदयार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. तसेच 29 विदयार्थ्यांनी व्दितीय श्रेणी प्राप्त केली आहे. तर 02 विदयार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केली आहे.

या परिक्षेमध्ये प्रियल मोरे ह्या विद्यार्थिनीने 70.10% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झाली आहे. तर मोहिनी पाटील ह्यानी 69.67% गुण मिळवून व्दितीय व दिपक मोरे ह्या विद्याथ्याने 64.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळाला आहे. विधी महाविदयालयाच्या प्राचार्या, डॉ. रेश्मा पाटील, उप-प्राचार्या, अ‍ॅड. निलम हजारे, प्रा. संदीप घाडगे, प्रा. दिपक नागे, प्रा. मेघा पलंकपरमबिल, प्रा. समिक्षा पाटील, प्रा. निलम म्हात्रे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version