ॲड. दत्ता पाटील यांना विनम्र अभिवादन

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, कोकणातील वंचित, बहुजन समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आयुष्य वेचणारे, रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अलिबागचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते ॲड. दत्ता पाटील यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग सार्वजनिक वाचनालयात त्यांच्या पुतळ्याला अलिबाग सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष सतिश प्रधान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे ज्येेष्ठ संचालक तथा ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त नागेश कुळकर्णी, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, सहा. ग्रंथपाल रजिता माळवी, अर्चना माळवी आदी उपस्थित यावेळी होते.

Exit mobile version