। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष रायगडचे सुपुत्र, अॅड. दत्ता पाटील यांची मंगळवारी (दि.27) पुण्यतिथी अलिबागसह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. या निमित्त त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दरम्यान त्यांच्या कार्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
दत्ता पाटील गोरगरीबांचे कैवारी, निष्णात विधिज्ञ, महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते होते. शेतकरी, कामगारांचे प्रश्न त्यांनी अधिवेशानात मांडले असून न्यायालयातदेखील वकील म्हणून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. खेड्यापाड्यातील मुले शिकली पाहिजे. त्यासाठी कोकण एज्युकेशन संस्थेमार्फत गरीबांसाठी शिक्षणाची दारे खुले केली. रायगड जिल्ह्यामध्ये दत्ता पाटील यांची पुण्यतिथी मंगळवारी मंगळवारी साजरी करण्यात आली. अलिबागमधील सार्वजनिक वाचनालयातील डोंगरे हॉल येथील अॅड. दत्ता पाटील यांच्या पुतळ्यास वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह संतोष बोंद्रे, जेष्ठ संचालक नागेश कुळकर्णी, नविनचंद्र राऊत, महेश पटेल, जिल्हा सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, सहाय्यक ग्रंथपाल रजिता माळवी तसेच अन्य कर्मचारी व मान्यवर आदी उपस्थित होते.