। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, गुरुवारी (दि. 18) त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी मानसी म्हात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी विज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, ॲड. निलम हजारे, मुख्याधिकारी सागर साळुंखे, पाणी सभापती अनिल चोपडा, महिला व बाल कल्याण उपसभापती ॲड. अश्वीनी ठोसर, नगरसेविका निवेदिता वाघमारे, ॲड. ऋषीकेश माळी, माजी नगरसेवक अजय झुंजारराव आदी उपस्थित होते. अलिबाग नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष अक्षया नाईक आहेत. त्यांनी काही दिवसांसाठी नगराध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्याकडे धुरा सोपविली आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून ॲड. मानसी म्हात्रे यांनी गुरुवारी (दि.18) सकाळी पदभार स्विकारला. अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थित प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा हाती घेण्यात आली.







