अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांची लाखमोलाची मदत

| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
काँग्रेसचे माजी आमदार स्व.मधूशेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे जेष्ठ पुत्र व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अ‍ॅड. प्रवीण मधुकर ठाकूर यांनी सुरू ठेवला असून गुरुवारी (21 जुलै) त्यांनी स्वतःच्या वाढदिवसी एक लाख रूपयांचा धनादेश रायगडच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास सुपूर्द केला.

यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या कन्या अपूर्वा ठाकूर, दिपक जैन, अ‍ॅड. सुजय घरत, समीर ठाकूर, हर्शल लाखम, स्वप्नील ठकेकर, सुषांत तुपट, अमोद मुंडे, सत्यजीत धोपावकर इ.उपस्थित होते. सहा.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कर्मचारी भास्कर नाटाळकर, बळीराम म्हात्रे, लालचंद कुंभार, लक्ष्मण पाटील, व दयाराम घासे या कर्मचारी वर्गाने अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांचे स्वागत केले.

अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांनी यावेळी बोलताना सैनिक कल्याण निधीला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून दरवर्शी मी मला शक्य असेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करीत असतो. यावर्षी मधुकर ठाकूर आपल्यात नाहीत, परंतु त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आम्हा सर्वांना पुढे सुरू ठेवायचा आहे अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. ठाकूर यांनी दिली आहे.

Exit mobile version