अ‍ॅड. प्रसाद पाटील यांचा सत्कार

| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा बार असोसिएनशनच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल अ‍ॅड. प्रसाद पाटील यांचा जेएसएम कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत जेएसएम कॉलेजचे माजी विद्यार्थी तसेच जेएसएम कॉलेज ल्यूमनी असो.च्या कार्यकारिणीचे सदस्य अ‍ॅड. प्रसाद पाटील यांची अध्यक्षपदी, तर जेएसएम कॉलेजचे माजी विद्यार्थी अ‍ॅड. अनंता पाटील यांची उपाध्यक्षपदी व अ‍ॅड. राजेंद्र माळी यांची खजिनदारपदी निवड झाली आहे. यानिमित्त जेएसएम कॉलेजच्या वतीने अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्रा. डॉ. अनिल पाटील व अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉच्या प्रा. प्रा. अ‍ॅड. नीलम हजारे उपस्थित होत्या.

Exit mobile version