ॲड. अशिष रानडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

| अलिबाग | प्रतिनिधी |

रुग्णांच्या मदतीला धावून येणारे अलिबाग शहरातील शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते ॲड. अशिष रानडे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी रविवारी शेतकरी भवनमध्ये त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अशिष रानडे हे वकीली क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातही सक्रीय आहेत. त्यांनी यापुर्वी शेकापचे आरोग्य सेलचे प्रतिनिधी म्हणून भुमिका बजावत अनेक गरजूंना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. गरजूंवर उपचार वेेर होत नसल्यास तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्यावर उपचार वेळेवर करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. ॲड. अशिष रानडे हे सध्या शेतकरी कामगार पक्ष अलिबाग शहर विधी सेलचे चिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा वाढदिवस रविवारी शेतकरी भवनमध्ये साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेवक प्रदीप नाईक, यतीन घरत, अशोक प्रधान, अक्षया नाईक, संदीप सारंग, आदी विविध शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version