| ठाणे | प्रतिनिधी |
येथील स्वर्गीय आनंद दिघे क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50 वी सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक कुमार- कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कुमार विभागात- ग गटात मुंबई शहर पश्चिम संघाने नाशिक ग्रामीण संघावर 47-24 असा विजय मिळविला. ह गटात नंदुरबार संघाने रत्नागिरी संघाचा 47-11 असा दणदणीत पराभव करीत विजय मिळविला. फ गटात नांदेड संघाने सिंधुदुर्ग संघावर 48-27 अशी मात करीत विजय मिळविला.
कुमारी विभागात साखळी सामन्यात ड गटात मुंबई शहर पश्चिम संघाने ठाणे शहर संघावर 41-26 असा विजय मिळविला. इ गटात सांगली संघाने जळगावचा 59-25 असा दणदणीत पराभव केला. क गटात सिंधुदुर्ग संघाने परभणी संघाचा 60-26 असा विजय मिळविला.