। पुणे । प्रतिनिधी ।
बालेवाडी पुणे येथील क्रीडांगणावर पुणे शहर राष्ट्रवादी कॉग्रेस, संदिप बालवडकर स्पोर्टस फाऊंडेशन,चेतक स्पोर्टस् फाऊंडेशन व धर्मवीर कबड्डी संघ यांच्या संसुक्त विद्यवाने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त 48 वी कुमार गट मुले व मुली अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे उद्धाटन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे मुख्य आयोजक संदिप बालवडकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अॅड.आस्वाद पाटील, शकुंतला ख़टावकर,मंगल पांडे, रविंद्र देसाई, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, सरकार्यवाह रविंद्र आंदेकर, राज्य संघटनेचे व पुणे जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी, स्पर्धा निरिक्षक मदन गायकवाड, पंच प्रमुख सुहास पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस क्रीडा सेलचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कुमार गट मुलांच्या झालेल्या सामन्यात अहमदनगर संघाने यजमान पुणे संघावर 43-32 अशी मात करीत विजयी साकारला. मुंबई शहर संघाने नांदेड संघावर 31-16 अशी मात करीत पहिला विजय नोंदविला.परभणी संघाने ठाणे संघावर 28-23 अशी मात करीत विजय मिळविला. रत्नागिरी संघाने औरंगाबाद संघावर 35-30 अशी मात करीत आपल्या गटात विजयी सलामी दिली.मुलींच्या सामन्यात यजमान पुणे संघाने परभणी संघावर 41-27 असा दमदणीत विजय मिळवित विजयी सलामी दिली.नाशिकने बीड संघावर 53-22 विजय मिळवित विजय मिळविला.