महिलांना प्रगत टेलरिंगचे प्रशिक्षण

| उरण | प्रतिनिधी |

उरणच्या जेएनपीए बंदरातील एपीएम टर्मिनल म्हणजेच जीटीआय बंदराच्या सीएसआर फंडामधून निरामय हेल्थ फाऊंडेशन माटुंगा मुंबई याच्या माध्यमातून उरणच्या पुर्व भागातील पुनाडे ग्राम पंचायत हद्दीतील महिलांसाठी प्रगत शिलाई मशीनचे क्लासेस घेण्यात येणार आहेत. या कोर्सचे औपचारिक उद्घाटन शनिवारी (दि.13) करण्यात आले. पुनाडे येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये शनिवारपासून पुढील आठ आठवड्यांचे प्रगत शिलाई मशीनचे क्लासेस घेण्यात येणार आहेत. दर शनिवारी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत या माध्यमातून येथील गरजू महिलांना प्रगत शिलाई मशीनवर काम कसे करायचे, कशाप्रकारे नव्या फॅशनचे कपडे शिवता येतील, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सुचिता जोशी या प्रशिक्षिती शिक्षिका देणार आहेत. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून एपीएम टर्मिनल्स म्हणजेच जीटीआय बंदराच्या वतीने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपयोगी येणारे बौद्धिक खेळांसाठीचे साहित्य वाटप करण्यात आले, तर विद्यार्थ्यांना देखील प्रत्येकी भेटवस्तूंचेही या निमित्ताने वाटप करण्यात आले.

Exit mobile version