| खरोशी | प्रतिनिधी |
कराटे आणि तायक्वांदो या मार्शल आर्ट्समध्ये मुलींची झपाट्याने भरारी सुरू असून, राज्यभरातील विविध स्पर्धांमध्ये त्यांची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे.
रॅडक्लीफ रॅप्सोडी तायक्वांडो स्पर्धेत अद्विका भंडारे विजयी सुवर्णपदकाने शाळेचा मान उज्ज्वल. रॅडक्लीफ ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे आयोजित रॅडक्लीफ रॅप्सोडी आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धा 2025 चे आयोजन खारघर येथे दिमाखात पार पडले. नवी मुंबई, ठाणे, कल्याण आणि बदलापूर येथील विविध शाळांमधून 150 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला मोठे स्वरूप दिले. या स्पर्धेत खारघर येथील रॅडक्लीफ शाळेची विद्यार्थीनी आणि कामोठे येथील रहिवासी वडील अॅड.बलराज. वाय. भंडारे आणि आई कांचन बलराज भंडारे यांची मुलगी अद्विका बलराज भंडारे हिने 8 ते 12 वयोगटात अप्रतिम कौशल्याचे दर्शन घडवून सर्वांना भुरळ घातली. तिने वेग, संतुलन, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत भक्कम विजय मिळवला आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले. अद्विकाच्या या तेजस्वी कामगिरीने शाळेचा आणि परिसराचा मान उंचावला असून तिच्या मेहनतीचे, चिकाटीचे शिक्षक आणि पालकांनी मनापासून कौतुक केले आहे.
अद्विकाची तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
