ॲड. राजीव साबळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

| माणगाव | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, कोकण विभागीय संघटक तसेच माजी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती असलेले ॲड. राजीव अशोक साबळे उद्या सोमवार, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माणगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या महत्त्वाच्या राजकीय प्रक्रियेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच विविध शहरांतील व ग्रामीण भागातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष केकाणे, पक्षाचे नेते चंद्रशेखर खानविलकर तसेच माणगावचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांनी संयुक्तपणे आवाहन करत माणगाव शहरातील हॉटेल आनंद भवन व बालाजी मंदिर परिसरात वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version