चोरट्याच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भीक मागणाऱ्या मुलांना पैसे दिल्यानंतर बाजूला काढून ठेवलेले पैशाचे पाकीट चोरट्याने लांबवले. हा प्रकार अलिबाग समुद्र किनाऱ्यावर शनिवारी घडला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग बीच येथे दोघेजण फिरायला आले होते. ते अलिबाग बीचवर वॉच टॉवर जवळील कट्टयावर बसले असताना बीचवर फिरणारे साधारण 8 ते 10 वर्षाची दोन मुले पैसे मागण्याकरिता आले. यावेळी दया आल्याने फिर्यादीने रा. रामनाथ, ता. अलिबाग व यांनी आपल्या खिशातून पॉकेट काढुन पॉकेटातील 5 रुपयाचे कॉईन सदर मुलापैकी लहान मुलाचे हातात दिला व पॉकीट बसलेल्या ठिकाणी बाजुला ठेवला. त्याचवेळी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे नकळत शेजारी ठेवलेले पॉकीट अज्ञात चोरुन नेले. सदर पाकिटात एकूण 3 हजार 500/- रुपये तसेच बँकेचे क्रेडिट, डेबिट कार्ड, लायसन्स आदी महत्वाची कागदपत्रे होती.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार भा.दं.वि.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार झीराडकर हे करीत आहेत.