| महाड | वार्ताहर | आज रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय हनुमंत जगताप यांची राशीप्र च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष मा. आम.आपल्या सर्वांचे लाडके माणिकराव जगताप* यांच्या अकस्मात निधनानंतर सदरचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.त्या रिक्त पदाची निवड आज संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. रमेश(काका)वैष्णव यांनी नानासाहेब यांचे अध्यक्ष पदी नाव सुचवले तर दयाराम (अण्णा) कालगुडे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी सि. दौ. सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक संपन्न झाली.यावेळी रामचंद्र तात्या देशमुख, प्रभाकरदादा महामुनकर, सोपानजी चाळके, महेंद्रजी पाटेकर,संजय मेहता,डॉ चेतन सुर्वे इत्यादी विश्वस्त उपस्थित होते.