योजना पूर्ण झाल्यावर मोर्बेत घरोघरी पाणी

| माणगाव | प्रतिनिधी |

साडे आठ कोटी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यावर मोर्बा गावात घराघरात पाणी येईल असे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी मोर्बा येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

मोर्बा ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा प्रारंभ खा. सुनील तटकरे व आ. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मोर्बा ग्रामपंचायत कार्यालय समोर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शेकापचे अस्लम राऊत, राष्ट्रवादीचे इकबाल धनसे, सुभाष केकाणे, शौकत रोहेकर, अब्दल्ला जाळगावकर, अल्ताफ धनसे, मोर्बा सरपंच शेहनाज हर्णेकर, विलास गोठल, हसनमिया बंदरकर, इकबाल हर्णेकर, अमोल मोहिते, उणेगाव सरपंच राजू शिर्के, राजू मोरे, नामदेव कासारे, सुलेमान म्हैसकर, संताजी पवार, जलील फिरफिरे, झुल्फिखार राऊत, भागोजीबुवा डवले, राजेंद्र जाधव, सातार्‍याचे ठेकेदार चंद्रकांत पाटील, हनीफ राऊत उपस्थित होते.

Exit mobile version