| माणगांव | प्रतिनिधी |
गावविकास समिती नाईटणे, स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थ, स्वदेश फाऊंडेशन, ग्रुप ग्रामपंचायत मोर्बा व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नाईटणे गावास स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. खा.सुनील तटकरे यांच्याहस्ते व स्वदेश फाऊंडेशनचे संचालक प्रदीप साठे व मान्यवरांच्या उपस्थितीत गाव विकास समिती नाईटणे यांना प्रमाणपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी महादेवराव बक्कम, इकबालशेठ धनसे, अस्लम राऊत, भागोजीबुवा डवले, तहसीलदार प्रियांका आयरे, शैलेश भोनकर, संगीता बक्कम, शहनाज हर्णेकर,माजी उपसरपंच इकबाल हर्णेकर, अब्दला गंगरेकर, हसनमिया बंदरकर, शौकत रोहेकर, राजू मोरे, संताजी पवार, डॉ.राहुल सुकाळे, नरेश तरडे, संचिता डवले, मुरकर महाराज आदींसह गावविकास समिती नाईटणे, ग्रामस्थ व महिला मंडळ नाईटणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाईटणे फाट्यापासून ते गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मान्यवरांच्या स्वागतासाठी सुशोभीकरणकरण करण्यात आले होते. यावेळी खा. सुनिल तटकरे, स्वदेश फाऊंडेशनचे संचालक प्रदीप साठे भागोजीबुवा डवले, संचिता डवले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.