लसूण महागल्याने भाज्या बेचव

| पनवेल | वार्ताहर |

टोमॅटो महाग झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्याबाबतची नाराजी व्यक्त केली जात होती. अशातच 250 रुपयांवरून टोमॅटोचे दर 20 रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत; तर दुसरीकडे किरकोळ बाजारात लसणाने 200 ते 300 रुपयांचा दर गाठला असल्याने फोडणीलाच महागाईचा तडका बसल्याने भाज्या बेचव झाल्या आहेत.

दररोजच्या जेवणात टोमॅटो खरेदी केले नाही तरी चालते, पण फोडणीसाठी लसूण, आले, कांद्याच्या फोडणीशिवाय भाजीही अळणीच लागते. यामुळे महाग असला तरी लसणाच्या विक्रीत फरक पडलेला नसल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. मात्र, गेल्या वर्षी लसणाचे उत्पादन अधिक झाल्याने चार किलो लसणासाठी 100 रुपयांचा दर आकारला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लसणाकडे पाठ फिरवल्याने यंदा लसणाचे लागवड क्षेत्रही घटले आहे. परिणामी, लसणाचे दर 200 ते 300 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

Exit mobile version