। उरण । वार्ताहर ।
उरण विधानसभा मतदारसंघात निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचारात जोर मारताना दिसत आहे. यावेळी आगरी कोळी समाजाविरोधात भाजपा उमेदवारांकडून बेताल वक्तव्ये केल्याप्रकरणी आगरी समाज आक्रमक होऊन प्रमुख पदाधिकार्यांनी आगरी समाजाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
याप्रसंगी उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतर सहकारी गावोगावी बॅनर हाती घेऊन आगरी समाजाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. यामुळे उरण विधानसभा मतदारसंघातील आगरी-कोळी-कराडी समाजामध्ये भाजपा उमेदवार महेश बालदी यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते व आगरी समाजाचे पदाधिकारी सुधाकर पाटील यांच्याबद्दल समाजात समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे नक्कीच समाजातील जनतेत मत परिवर्तन होईल, अशी चर्चा उरण विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.